Skip to content

माझा प्रभू उठला | Majha Prabhu Uthala Lyrics in Marathi

Majha Prabhu Uthala Song Lyrics in Marathi

माझा प्रभू उठला

माझा प्रभू उठला
माझा प्रभू उठला मृत्युंजय झाला
शांतीचा राजा प्रणाम त्याला,
तो खरोखरी उठला (२)

स्वर्गीय राजा देह झाला
मानव पुत्र क्रूसी खिळला
चला सांगू जगता
ख्रिस्त असे सत्य सुवार्ता

मरणाची नांगी मोडली
जीवन ज्योत सदा पेटविली
विश्वास ठेवू आपण
ख्रिस्त असे जगाचे तारण

दर्शन मिळाले ख्रिस्ताचे
नवीन आशा नवीन श्रद्धेचे
येईल स्वर्गातून पुन्हा
ख्रिस्त असे जीवनाची भाकर

Majha Prabhu Uthala Video Song Marathi