Skip to content

अजाण आम्ही तुझी लेकरे | Ajan Amhi Tuji Lekray Lyrics Marathi

Ajan Amhi Tuji Lekray Lyrics in Marathi

अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा…॥२॥

चंद्र सुर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर डोंगर
फुले फळे पाखरे…॥२॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा…॥२॥

अनेक नावे तुला तुझे रे
दाहि दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर…॥२॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा…॥२॥

खूप शिकावे काम करावे
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी…॥२॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा…॥२॥

प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा…॥२॥