Unchavile Mala Song Lyrics in Marathi
उंचाविले मला प्रभू तू, उंचाविले मला
अतूट प्रेमाने, अतुल सामर्थ्याने
उंचाविले मला (2)
रक्ताच्या धारा गळविता
शरीराचे चिथडे तुडविता (2)
क्रूस खांदी आनंदाने
उंचाविले मला (2)
पापाच्या दरीतून सोडविता
मृत्यूच्या खाचेतून उठविता (2)
अंधारात प्रकाश आशेने
उंचाविले मला (2)