Prabhu Mi Konacha Konacha Lyrics in Marathi
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥२॥
माझा नच इतराचा…॥२॥
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥२॥
तुझाच परि मी घे घे माझी…॥२॥
तन-मन-धन ही वाचा…॥२॥
पापमुक्त तू केले मजला…॥२॥
मज तू निधि करूणेचा…
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥२॥
पापांचा मी होतो राशी…॥२॥
सांगु किती त्या जाचा…॥२॥
उद्धारिले तू मज पतिताला…॥२॥
सिंधु देशि अमृताचा…
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥२॥
हस्तपाद ही पाच इंद्रिये…॥२॥
आत्मा प्राणहि यांचा…॥२॥
तवाधीन बा झाला झाला…॥२॥
दास मी तव चरणांचा…
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥२॥
माझा नच इतराचा…॥२॥
प्रभू मी कोणाचा कोणाचा…॥३॥