Mi Bhakar Jevaanachi Song Lyrics in Marathi
मी भाकर जीवनाची
स्वर्गीय भाकर मी ही
भाकरीस या जो खाईल,
ना त्या कधी भूक लागेल
श्रद्धा जो मजवरी ठेविल
ना त्या कधी तहान लागेल
मी भाकर जीवनाची
स्वर्गीय भाकर मी ही
देह रूधीर देऊनी
क्रुसावरी प्राण अर्पूणी
तारीयले मानवा
पापमुक्त करूनी
मी भाकर जीवनाची
स्वर्गीय भाकर मी ही
जो येई मजपाशी
वसतो मी त्या हृदयी
पावन त्या करूनी
स्वर्गीय सुख देई
मी भाकर जीवनाची
स्वर्गीय भाकर मी ही