Deva Tuzya Dayechi Lyrics in Marathi
देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान
तुझ्या कृपेचा भुकेला
दे खावयास अन्न
देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान…॥धृ॥
प्रभु तूच मेंढपाळ
माझा करी सांभाळ…(२)
विश्वास करण्या मजला
दे विश्वासाचे दान…(२)
देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान…॥धृ॥
शिकविले प्रीती करण्या
शांतीचे जीवन जगण्या…(२)
दे शांती प्रीती मजला
तू जीवनाची खाण…(२)
देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान
तुझ्या कृपेचा भुकेला
दे खावयास अन्न
देवा तुझ्या दयेची…