Skip to content

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता | Tu Kiti Kiti re Sunder Ashil Khrista Song Lyrics Marathi

Tu Kiti Kiti re Sunder Ashil Khrista Song Lyrics Marathi

हि तुझीच श्रुष्टी धरणी अंबर ख्रिस्ता
तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

झाडांना कळते तुझ्या ऋतूंची वाणी
गातात पाखरे तुझीच मंजुळ गाणी
गाण्यात सुवार्ता तुझी निरंतर ख्रिस्ता
तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

वेलीवर हिरव्या फुल उमलते कैसे
आकाश रोजचे रंग बदलते कैसे
हि तुझीच किमया नयन मनोहर ख्रिस्ता
तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

रंगात रंगुनी पहाट गाणे म्हणते
फुलताना हसरी कळी कळी गुणगुणते
सुमनात उतरते तुझेच दहिवर ख्रिस्ता
तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

हि तुझीच श्रुष्टी धरणी अंबर ख्रिस्ता
तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

Tu Kiti Kiti re Sunder Ashil Khrista Song Lyrics Marathi