Parmeshwar Mendhpal Maza Lyrics in Marathi
परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती…(२)
हिरव्या कुरणी नेतो मजला
प्रेमे मजला चरवीतो…(२)
ओढ्याचे मज देतो पाणी
माझ्या जीवा फुलवितो
परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती…॥धृ॥
आपुल्या नावासाठी देव
सत्यपथाने मज नेतो…(२)
अरिष्टातुनी वाचवितो मज
माझ्या जीवाला जपतो
परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती…(२)
मजवर त्याची प्रीती…(२)