या चला रे जाऊ | Ya Chala Re Jau
Marathi Christian Lyrics Geet
या चला रे जाऊ
दर्शन येशूचे घेऊ
उद्धारक हा पाहू
1.
तारा चमके पूर्वेला
चमके सर्वांसाठी तो –(2)
मी गेल्यानी दर्शना
किती सुंदर तो समय
किती सुंदर तो समय
या चला………
2.
गीत दूतानी गायले
येशू बाळ जन्म आले –(2)
(योसेफा) निघे दर्शना
करण्यास प्रभूची स्तुती
करण्यास प्रभूची स्तुती
या चला……..
3.
या चला जाऊ पाहू
गोठ्यात येशूला पाहू –(2)
सर्व जगाचा तो प्यारा
तोची आमुचा सहारा
तोची आमुचा सहारा
या चला रे जाऊ
दर्शन येशूचे घेऊ
उद्धारक हा पाहू