तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें | Tuz Soduni Khrista Jau Kuthe
Marathi Christian Lyrics Geet
तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें
विरह तुझा रे नरक भयंकर
विरह तुझा रे नरक भयंकर
भासे प्रलयानल पेटे
तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें
धर्मरवी तू क्षणभर नसता
धर्मरवी तू क्षणभर नसता
मम हृत्कोशी तम दाटे
तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें
तुज वाचुनिया मार्ग जगी ह्या
तुज वाचुनिया मार्ग जगी ह्या
मज दिसती तितुके खोटे
तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें
सहवासाहुन तुझ्या मला रे
सहवासाहुन तुझ्या मला रे
स्वर्गाचे सुख नच मोठे
तुज सोडुनि ख्रिस्ता जाउ कुठें