🎵 ChristianLyrics
← Back to Home

तू राज्य करी | Tu Rajya Kari

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

केले प्रभू, रिक्त तू स्वतःला

त्यागुनी सर्व महिमा

असूनहि देवा, केले शुन्य तू स्वतःला

झाला मनुष्या समान

बनला एक दासासमान


केले सहन, हां कृसाचे मरण

आणि झाला सर्वात महान


तू राज्य करी, तू राज्य करी

तू राज्य करी सार्‍या विश्‍वावरी,

गुडघा टेकेल प्रत्येक गुडघा टेकेल

गुडघI टेकेल येशू नामासाठी


स्वर्गामध्ये आहे स्थिर तुझे सिंहासन

पराक्रमी देवा

गौरवाने चाले तुझे शासन

जग हे चरणी तुझ्या

नतमस्तक मनुष्य सारा


वधलेला निर्दोष कोकरा

तुझाच सर्व अधिकार


तू राज्य करी, तू राज्य करी,

तू राज्य करी सार्‍या विश्‍वावरी,

गुडघा टेकेल प्रत्येक गुडघा टेकेल,

गुडघI टेकेल येशू नामासाठी –(2)


काल आज युगान युग,

येशू तू आहे प्रभू –(2)


तू राज्य करी, तू राज्य करी,

तू राज्य करी सार्‍या विश्‍वावरी,

गुडघा टेकेल प्रत्येक गुडघा टेकेल,

गुडघI टेकेल येशू नामासाठी –(2)


▶ Watch on YouTube Video