🎵 ChristianLyrics
← Back to Home

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता | Tu Kiti Kiti re Sunder Ashil Khrista

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

हि तुझीच श्रुष्टी धरणी अंबर ख्रिस्ता

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता


झाडांना कळते तुझ्या ऋतूंची वाणी

गातात पाखरे तुझीच मंजुळ गाणी

गाण्यात सुवार्ता तुझी निरंतर ख्रिस्ता

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता


वेलीवर हिरव्या फुल उमलते कैसे

आकाश रोजचे रंग बदलते कैसे

हि तुझीच किमया नयन मनोहर ख्रिस्ता

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता


रंगात रंगुनी पहाट गाणे म्हणते

फुलताना हसरी कळी कळी गुणगुणते

सुमनात उतरते तुझेच दहिवर ख्रिस्ता

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता


हि तुझीच श्रुष्टी धरणी अंबर ख्रिस्ता

तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता

▶ Watch on YouTube Video