तारणारा तो जन्मला आहे | Taranara To Janmala Aahe
Marathi Christian Lyrics Geet
तारणारा तो जन्मला आहे
तारणारा तो जन्मला आहे –(2)
1.
अंबरी रोज असंख्य तारे
लखलखती आहेत सारे –(2)
आज नवखा तो पूर्वेला आहे –(2)
तारणारा तो……..
2.
आज गव्हाणीच्या हो दारी
मेंढपाळांचा कळप भारी –(2)
मागी लोकांचा काफीला आहे –(2)
तारणारा तो………
3.
चुंबण्यास धरतीच्या ओठी
येशू बाळास पांघरण्यासाठी –(2)
स्वर्ग किंचित वाकला आहे –(2)
तारणारा तो जन्मला आहे
तारणारा तो जन्मला आहे