स्पर्श त्याने मला मात्र केला | Sparsh Tyane Mala Matra Kela
Marathi Christian Lyrics Geet
स्पर्श त्याने मला मात्र केला (X2)
त्याच वेळी महारोग गेला (X2)
बोलला तो तिथे मंत्र नाही (X2)
लाविले औषधाला ना काही (X2)
दिव्य स्पर्शास व्याधी हि भ्याला (X2)
त्याच वेळी महारोग गेला (X2)
बोललो मीच त्या ख्रिस्तराया (X2)
शक्त आहेस व्याधी हराया (X2)
त्यास विश्वास माझा कळाला (X2)
त्याच वेळी महारोग गेला (X2)
जे घडे ते न कोना निवेदि (X2)
ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी (X2)
सत्य केव्हा तरी येई मुखाला (X2)
त्याच वेळी महारोग गेला (X2)
स्पर्श त्याने मला मात्र केला (X2)
त्याच वेळी महारोग गेला (X3)