राजा येशूचा जन्म झाला | Raja Yeshucha Janma Jhala
Marathi Christian Lyrics Geet
आनंद झाला आनंद झाला
राजा येशूचा जन्म झाला –(2)
बोला येशूचा जन्म कशाला झाला –(4)
पापांपासून मुक्ती देण्यास झाला
1.
मरियेला मोठा अनुग्रह झाला –(2)
दाविद नगरात जल्लोष झाला –(2)
शांतीचा राजा आला रे आला
राजा येशूचा जन्म झाला –(2)
आनंद झाला………
2.
बेथलेहेमात येशू जन्मास आला –(2)
कुवारीच्या गर्भी येशू जन्मास आला –(2)
यहुदाचा सिंह आला रे आला
राजा येशूचा जन्म झाला –(2)
आनंद झाला……..
3.
(पवित्र) आत्याने येशू जन्मास आला –(4)
राजांचा राजा येशू जन्मास आला –(4)
शैतानाचा नाश करण्यास आला
राजा येशूचा जन्म झाला –(2)
आनंद झाला……..