राजा येशू आला | Raja Yeshu Aala
Marathi Christian Lyrics Geet
राजा येशू आला, राजा येशू आला
सैतानाला जिंकायाला, राजा, येशू आला (2)
घालवुनी पापें आणि दुःखें घोर
पूर्ण शांती द्यावयाला, राजा येशू आला (2)
आनंदी आनंद झालों पापमुक्त
मला शुद्ध करायाला, राजा येशू आला (2)
वधस्त्तंभावरी प्राण देता झाला
जगताचा त्राता झाला, राजा येशू आला (2)
राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभु
बोला सारे जयजय बोला, राजा येशू आला (2)