🎵 ChristianLyrics
← Back to Home

प्रेमाची ही ज्वाला देवा | Premachi He Jwala Deva Lyrics Marathi

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

प्रेमाची ही ज्वाला देवा

तव हृदयी पेटे

तशीच पेटो प्रेमज्योत मम

हृदयी विश्वपते

प्रेमाची ही ज्वाला देवा…॥धृ ॥


जेथे आहे द्वेष तेथे मज

प्रेमा पेरू दे…

अपराध्यांना क्षमा देऊनी

प्रेमे जिंकू दे…

प्रेमाची ही ज्वाला देवा…॥धृ ॥


अशांतिच्या बाजारी मजला

शांती वर्षू दे…

असत् पटल ते दूर सारूनी

सत्या दावू दे…

प्रेमाची ही ज्वाला देवा…॥धृ ॥


श्रद्धाहिन जनतेच्या हृदयी

श्रद्धा निर्मू दे…

वैफल्याचे तिमिर जाळुनी

आशा उजळू दे…

प्रेमाची ही ज्वाला देवा…॥धृ ॥


दुःखाचा संहार करूनी

हर्षा उधळू दे…

सकलदुरितभय दूर सारूनी

सैख्या पसरू दे…

प्रेमाची ही ज्वाला देवा…॥धृ ॥


▶ Watch on YouTube Video