प्रभु राजा चा वेड लागला | Prabhu Raja Cha Ved Lagla
Marathi Christian Lyrics Geet
प्रभु राजाचा वेड लागला कसा झाला मला कळेना
प्रभु ख्रिस्ताचा वेड लागला कसा झाला मला कळेना
कोरस: येशू राजाने शोधिले मला
तारण लाभले मला (2)
एकटा होतो मी, कुणी नव्हता माझ्या पाठी
लाचार होतो मी, कुणी नव्हता माझ्यासाठी
आईच्या गर्भी पाहिले मला
जन्माआधी निवडले मला (2)
प्रभु राजाचा वेड लागला
कसा झाला मला कळेना
प्रभु ख्रिस्ताचा वेड लागला
कसा झाला मला कळेना
पापांच्या साखळीत अडकले होते जीवन माझे
सैतानाच्या बंधनात मृत होते जीवन माझे
सर्व पापातून काढले मला
अनंत जीवन लाभले मला (2)
प्रभु राजाचा वेड लागला
कसा झाला मला कळेना
प्रभु ख्रिस्ताचा वेड लागला
कसा झाला मला कळेना