🎵 ChristianLyrics
← Back to Home

प्रभु गाऊ तुझे गुणराया | Prabhu Gau Tuje Gunaraya

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

प्रभु गाऊ तुझे गुण राया

प्रभु तुचि प्रेमळ बापा…(२)


धरतीचा तू निर्माता

आकाशाचा तू विधाता

तार्यांचा तूची कर्ता

जगताचा तूची त्राता


तुज शोधु कुठे मी राया

प्रभु तुचि प्रेमळ बापा


प्रभु गाऊ तुझे गुण राया

प्रभु तुचि प्रेमळ बापा…॥धृ॥


वार्यांची झुळझुळ विरली

लाटांची खळखळ सरली

दुःखाने होते जग भरले

यामधुनि तू जन्मा आला


उपकार कसे मी फेडू

प्रभु तुचि प्रेमळ बापा


प्रभु गाऊ तुझे गुण राया

प्रभु तुचि प्रेमळ बापा…(५)


▶ Watch on YouTube Video