🎵 ChristianLyrics
← Back to Home

ओल्या मातीचा | Olya Maaticha

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

ओल्या मातीचा तू एक साचा,
तुझ्या देहाचा नाही भरवसा –(2)
नको देउ हवाला उद्याचा

आज येशुचा स्वीकार कर,
पश्चाताप कर मानवा –(2)
पश्चाताप कर मानवा –(2)

1.

पातकात वाटते मजा,
भोगशील तू पुढे सजा –(2)
पश्चातापे शरण प्रभुला जा –(2)
सुधर जरा पापी मानवा –(2)
आज येशुचा ………..

2.

शुद्ध करेल रक्त येशुचे,
मुक्त करेल रक्त येशूचे –(2)
राहो आज स्मरण येशूचे –(2)
जाईल जन्म वाया मानवा –(2)

आज येशुचा स्वीकार कर,
पश्चाताप कर मानवा –(2)
पश्चाताप कर मानवा –(2)

▶ Watch on YouTube Video