🎵 ChristianLyrics
← Back to Home

मला मुक्त करण्या | Mala Mukt Karnya

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

नमतो चरणावर तुझ्या आम्ही (३)


१. माझ्या पापाचे कारण

केले तु देहधारण

दुःख साहुनी, रक्त सांडूनी

साधिले माझे तारण

हालेलुया आमेन….हा हालेलुया … नमतो….


२. किती हि प्रीती अपार

साहुनी पापाचा भार

मरण साहुनी, जीवंत होऊनी,

उघडिले स्वर्गाचे द्वार

हालेलुया आमेन….हा हालेलुया नमतो…


३. तुझ्या प्रीतीचे प्रमाण

क्रूशी देऊनी स्वप्राण.

आसनी बसुनी, मध्यस्थ होउनी,

कैवारी माझा महान

हालेलुया आमेन….हा हालेलुया… नमतो..


▶ Watch on YouTube Video