मी कुठे ही कसा ही असो | Mi Kuthe Hi Kasa Hi Aso
Marathi Christian Lyrics Geet
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
मृत्यू छायेतूनी चालता
मी असावे स्मरूनी तुला…॥2॥
जिंकुनी मृत्यूला जो उठें
जिंकुनी मृत्यूला जो उठें
तो प्रभू नेत्री माझ्या दिसो
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
पाप अंधार हा दाटला
मी दिवा चेतवावा मनी…॥2॥
वचन तेजामध्ये उजळता
वचन तेजामध्ये उजळता
मार्ग नीतीचा मी दिसो
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
बंधने या जगाची किती
मुक्तीदाता परी येशु तू…॥2॥
हात या दुर्बलाचे प्रभू
हात या दुर्बलाचे प्रभू
जोडलेले तुझ्या पदी दिसो
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥
मी कुठे ही कसा ही असो
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥धृ॥
ख्रिस्त माझ्या मधे तो दिसो…॥2॥