मला मुक्त करण्या | Mala Mukt Karnya
Marathi Christian Lyrics Geet
मला मुक्त करण्या पापातूनी,
येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी || ध्रृ ||
कुकर्म केले मी या हाताने
जखडले हात तुझे खिळ्यांने
पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी ||१||
केले विचार मी पातळी
मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी
तारणाचा मुकुट मला घालूनी ||२||
मार्ग चुकलो मी मेंढरापरी
विंधीले पाय तुझे क्रूसावरी
खऱ्या जीवनाची वाट मला दावूनी ||३||
विव्हळत होतो मी वेदनेचे
छिन्न-छिन्न देह तुझा चाबकाने
रोगातूनी मला मुक्त करूनी ||४||
मला मुक्त करण्या पापातूनी
मला मुक्त करण्या शापातूनी
मला मुक्त करण्या रोगातूनी
मला मुक्त करण्या व्यसनातूनी
मला मुक्त करण्या गरिबीतूनी
मला मुक्त करण्या सार्या संकटातूनी
रक्त वाहिले तुझ्या देहातुनी (७)
रक्त रक्त रक्त तुझ्या देहातुनी