माझा येशु मला प्रिय फार | Maazha Yeshu Mala Priya Faar
Marathi Christian Lyrics Geet
माझा येशु मला प्रिय फार
ह्या जीवनात तोच आधार
आपत्तीत विपतीत ह्या जीवन यात्रेत
तो कधी ना मला सोडणार (x2)
हा जीवन प्रवास कठीण, येते अनेक प्रतिकूल क्षण
दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्नी स्तंभ, माझा वाटाड्या प्रति दिन
तो आधी व अंत आहे, हृदयी आनंदाचा झरणा आहे
दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणीच, माझा प्रतिदिन भार आहे
माझ्या येशुची अपरंपार प्रीती, मला नाही कशाची भीती
क्लेश, संकट, मरण, नग्नता, उपोषण, ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती
माझा येशु मला प्रिय फार, ह्या जीवनात तोच आधार
आपत्तीत विपतीत ह्या जीवन यात्रेत तो कधी न मला सोडणार
तो कधी न मला सोडणार