कोणी नसे कुणाचा | Koni Nase Kunacha
Marathi Christian Lyrics Geet
कोणी नसे कुणाचा, बंधु सखा रे आपुला –(3)
1.
कैसा करू भरोसा या आप्त मंडळीचा,
सर्व सुखाचे साथी कोनी नसे कुणाचा,
येताच संकटे ही सोडीती साथ आपुला –(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला –(2)
कोणी नसे कुणाचा………
2.
घम हा तुझा रे जीवा आला कसा कळेना,
परके हे सारे वेड्या मन के आपुले जाला,
आभास हा सुखाचा निर्माण तूच केला –(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला –(2)
कोणी नसे कुणाचा………
3.
चल रे जीवा तु आता दोघे मिळूनी जाऊ,
ना सोबती ना साथी आई ना बाप भाऊ,
सुख दुख आयुष्याचे कंठवायाचे तुझला –(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला –(2)
कोणी नसे कुणाचा………
4.
देवा मला दे आता, तव हात आसर्याचा,
सोडू नको तू मझला, आधार तूच माझा,
तू घातले सजन मी लावी आता तिरला –(2)
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला –(2)
कोणी नसे कुणाचा………