🎵 ChristianLyrics
← Back to Home

किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे | Kiti Samarthya Dhanya Prabhu Tula Re

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे

किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे!

मोठे नवल वाटते मला रे ||ध्रु||


येशु काना गावी गेला

मरिया होती त्या लग्नाला

द्राक्षरस तो संपला

त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे |१|


अडतीस वर्षाचा आजारी

पडला होता खाटेवरी

त्याला शक्ती नव्हती खरी

खाट उचलून चाल बोलला रे |२|


एक जन्मांध भिकारी

बसला होता वाटेवरी

त्याला दृष्टी नव्हती खरी

चिखल लावूनी त्याला दृष्टी दिली रे |३|


येशु राना मध्ये गेला

लोक होते त्या ठायाला

उपदेश ऐकायला

पाच भाकरी पाच हजाराला रे |४|


केलेले चमत्कार फार

गरिबांवर उपकार

प्राण दिला खांबावर

तारण करूनी स्वर्गात तो गेला रे |५|


▶ Watch on YouTube Video