🎵 ChristianLyrics
← Back to Home

काळ चालला धावत धावत | Kal Chalala Dhavat Dhavat

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

काळ चालला धावत धावत

नच थांबे क्षणभरी

विचार कर अंतरी मानवा || ध्रु ||


प्रभू येशूने संधी दिधली

फिर मागे आल्याचं पाऊली

टाक पातके येशू जवळी

तोच खरा कैवारी || 01 ||


बघता बघता जाईल संधी

उतरेल तुझी केव्हा धुंदी

सुटलेला क्षर भात्यातून कधी

येईल का माघारी || 02 ||


नकोस दवडू क्षण मोलाचा

जगात नाही कुणी कुणाचा

सर्व सुखाचे कुणी दुःखाचा

नाही वाटेकरी || 03 ||


▶ Watch on YouTube Video