जीवन घे हे माझे सारे | Jeevan Ghe Hey Majhe Sare
Marathi Christian Lyrics Geet
जीवन घे हे माझे सारे
प्रभू अर्पिले तव पदि रे…(२)
आयुष्याचा क्षण-क्षण रे घे
आयुष्याचे हे दिन अवघे
तुझ्या स्तुतिस्तव अर्पित रे
तुझ्या स्तुतिस्तव अर्पित रे
जीवन घे हे माझे सारे
प्रभू अर्पिले तव पदि रे…(२)
कंठ वाहि मी तुझ्याच चरणी
गाण्या केवळ तव मधु गाणी
ऐसी वाणी दे मज रे
ऐसी वाणी दे मज रे
जीवन घे हे माझे सारे
प्रभू अर्पिले तव पदि रे…(२)
प्रभू अर्पिले तव पदि रे…(२)