🎵 ChristianLyrics
← Back to Home

जय जय जगदीशा | Jai Jai Jagadisha

Marathi Christian Lyrics Geet

Marathi

जय जय जगदीशा

जय जय जगदीशा!

जगाला तुझी मात्र आशा;

जय मंगलधामा!

जगावर तुझा मात्र प्रेमा

जय जगदाधारा!

जगाला तुझा मात्र थारा.

जय जय विश्‍वपते!

जग हे तुझी वाट बघते.


तुझी मात्र सेवा ।

घडू दे जगामध्ये, देवा;

तुझे राज्य येवो,।

जगी या स्वर्ग उभा राहो.

तुलाच वंदन घे।

अमुचे वैभव तू अवघे.

तुझ्या मात्र चरणी ।

रमू दे सहर्ष दिनरजनी.


प्रभो परात्पर,।

जय करुणाकर!

जय जय जय बापा!

जय जय जय पुत्रा!

जय जय जय आत्म्या!


▶ Watch on YouTube Video