घाव दुःखाचा भरणार तूच रे | Ghav Dukhacha Bharnar Tuch Re
Marathi Christian Lyrics Geet
घाव दुःखाचा भरणार तूच रे (२),
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे (२),
पुण्य पदरात माझ्या ना काही (२),
पाप जाळ्यात काया फसे ही (२),
अज पाप्यास उधर तुच रे ।
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे;
घाव दुःखाचा भरणार तूच रे,
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे ।
गुंतुनी मोहपाशात स्वामी (२),
दूर गेलो तुझ्यापासूनि मी (२),
तरी दिनास स्वीकार तूच रे ।
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे;
घाव दुःखाचा भरणार तूच रे,
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे ।
हे अनादी प्रभो प्रिय ख्रिस्ता,
तुच त्राता जगाचा नियंता;
तो अनादि प्रभू प्रिया ख्रिस्ता,
तूच त्राता जगाचा नियंता (२);
देशी जन्मास आकार तूच रे;
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे,
घाव दुःखाचा भरणार तूच रे,
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे (३);
घाव दुःखाचा भरणार तूच रे,
साऱ्या विश्वाचा आधार तूच रे