अर्पितो मी प्रभूला | Arpito Mi Prabhula Song Lyrics Marathi
Marathi Christian Lyrics Geet
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (२)
स्वीकारूनी प्रभू घे
हृदयी मला तुझ्या रे
हृदयी मला तुझ्या रे
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (१)
फुलापरी हे माझे
जीवन सदा असावे (२)
फुलताच मी पडावे
चरणी प्रभू तुझ्या रे
चरणी प्रभू तुझ्या रे
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (१)
दिपापरी हे माझे
जीवन सदा असावे…
प्रभू सदा मंदिरात
जळु दे मला तुझ्या रे
जळु दे मला तुझ्या रे
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (१)
संतापरी हे माझे
जीवन सदा असावे (२)
सदा लीन मी असावे
कार्यात प्रभू तुझ्या रे
कार्यात प्रभू तुझ्या रे
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (२)
स्वीकारूनी प्रभू घे
हृदयी मला तुझ्या रे
हृदयी मला तुझ्या रे
अर्पितो मी प्रभूला
जीवन हे माझे सारे (२)
जीवन हे माझे सारे (२)