अनमोल या प्रीतीला | Anmol Ya Pritila
Marathi Christian Lyrics Geet
अनमोल या प्रितीला –(2)
कवटाळूनी धरावे
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी –(2)
1.
देवाने या जगावर अनमोल केली प्रीती
धाडीला पुत्र जगती जोडावयास नाती
प्रभू येशूचा प्रीतीची –(2)
आठवण सदा करावी
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी –(2)
अनमोल या प्रितीला………
2.
प्रभु येशूचा प्रमाण वधस्तंब हे निशाण
आम्हा पापीयांच्यासाठी देला क्रूसावरी प्राण
राजाचा रंक झाला –(2)
पाप्याची मान मिळाली
प्रीती तुझीच स्मरावी ह्रदयात साठवावी –(2)
अनमोल या प्रितीला……