Khrist Maza Tarnara Lyrics in Marathi
ख्रिस्त माझा तारणार
मला वाटे प्रिय फार.
ज्या ज्या वेळी होते दुःख
करितां धांवा देतो सुख.
किती नम्र प्रभू झाला
पापी जग तारायाला.
मातेपरी देतो धीर
म्हणे, आता तरी फीर.
काय सांगू त्याचे प्रेम
देई वारंवार क्षेम.